*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीचे सुपुत्र मा.राहुलजी नार्वेकर यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती कोकण व सावंतवाडी चे सुपुत्र मा.श्री राहुलजी नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शहरामध्ये आपल्या निवासस्थानी आले असताना त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून विविध विषयांवरती सविस्तर दीर्घकाळ चर्चा ही जिवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केली
अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती कोकण व सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी चे सुपुत्र मा.श्री राहुलजी नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शहरामध्ये आपल्या निवासस्थानी आले असताना त्यांची सदिच्छा भेट ही जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले
यावेळी संस्थानचे युवराज लखन राजे सावंत भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे नेते दिलीप भालेकर तसेच भाजपचे नगरसेवक श्री प्रतीक बांदेकर भाजप चे संयोजक श्री नागेश जगताप तसेच श्री.महेश बांदेकर श्री सुदेश नेवगी तसेच अनेक कार्यकर्ते यांनी स्वागत समारंभाच्या समयी उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्राचे विधानसभेची सभापती श्री राहुल नार्वेकर यांच्याशी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दीर्घकाळ व विकास कामावरती तसेच नोकरी व व्यवसाय तरुण युवकांना कशा प्रकारे यासंदर्भात कशी मिळेल याबाबत चर्चा करून तसेच महाराष्ट्रातील आरोग्य समस्या बाबत चर्चा केलीत्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच तरुण युवकांना रोजगार कसा मिळेल याबाबत सविस्तर चर्चा राजू मसुरकर यांनी करून तसेच निवेदन देऊन आपण कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीतील सुपुत्र असल्याने याबाबत योग्य ती समस्या सोडवा असे निवेदन मा. राहुलजी नार्वेकर यांना दिले आहे
अशी माझी व सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची इच्छा आहे असे मसूरकर यांनी राहुल जी नार्वेकर यांना सांगण्यात आले
तसेच त्यांना निवेदन देत असताना त्यामध्ये सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांना केवळ एक वर्षासाठी जिल्हाधिकारी व सिव्हिल सर्जन याच्याकडे अर्ज करून बोंड केलेल्या डॉक्टर यांना केवळ 85 हजार रुपये पगार दर माहा दिला जातो
त्याचप्रमाणे शासनामार्फत भरती झाल्यास एक लाख वीस हजार रुपये तसेच वेगवेगळे अलोन्स चाळीस हजार रुपये एकूण एक लाख साठ हजार रुपये एवढा तूटपुंज पगार शिक्षणाच्या मनाने कमी दिला जातो
हा पगार काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षांपूर्वीपासूनचा आहे महाराष्ट्रातील महाविद्यालय रुपये प्राध्यापकांना दोन लाख पन्नास हजार रुपये एवढा दर माहा पगार दिला जातो त्याचप्रमाणे आयटी इंजिनियर ला रिलायंस किंवा टाटा अशा विविध कंपनीमध्ये वार्षिक पन्नास लाखाचे पॅकेज असते यामुळे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर तज्ञ यायला इच्छुक नसतात
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे तरुण युवक युवती हे गोव्यामध्ये नोकरीला आहेत गोव्यामध्ये विविध कंपनी येण्याची कारण म्हणजे 35 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना विविध कंपनी गोव्यामध्ये येण्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये कंपनीला 50% सूट दिली होतीयामुळे विविध कंपनी उद्योग गोव्यामध्ये वाढले गेले त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून बजेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये व पर्यटन जिल्हा म्हणून या कोकणच्या तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने आपण गोव्यासारख्या विविध कंपनींना इन्कम टॅक्स मध्ये भरीव सूट दिल्यास आपल्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो व तरुण युवकांना गोवा मुंबई पुणे बेंगलोर अशा विविध शहरांमध्ये नोकरीसाठी जाण्याचा समस्या दूर होऊ शकते

