कणकवली तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

कणकवली तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ- शाखा कणकवली आयोजित*

*कणकवली तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न*

*कणकवली (शिरगांव ): संतोष साळसकर*

तेली समाज म्हणजे तल्लख बुद्धीचा समजला जातो. या समाजाने हि परंपरा पुढे अबाधित सुरू ठेवलेली आहे. दहावी, बारावी पदवीधर व विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाज नेहमीच खंबीरपणे उभा आहे. यापुढे समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढते. आयुष्यात सुख आणि दुःखाचा योग्य समतोल राखण्यासाठी ध्यानधारणेचा स्विकार केला पाहिजे. योग्य मार्गदर्शनाने आणि चांगल्या विचारांनी अधिक प्रेरणा मिळते. आता तरुण युवकांनी हा समाजाचा वारसा पुढे चालवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला त्यांनी त्याची जाणीव ठेवून भविष्यात विविध क्षेत्रात आपले नाव रोशन करावे आणि समाजाच्या नावलौकिकात अधिकची भर टाकावी. समाजासाठी नेहमीच एकमेकांशी एकसंघ राहून जोडलेले राहूयात. वाईट ते सोडून देऊयात आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करुयात असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ- शाखा कणकवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कणकवली येथील उत्कर्ष लाॅजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष परशुराम झगडे, जिल्हा सचिव संजय कवटकर, माजी अध्यक्ष आबा तेली,‌ गणपत मालंडकर, नंदकुमार आरोलकर, कणकवली तालुका अध्यक्ष महेश डिचोलकर, खानविलकर कोचिंग क्लासचे संचालक – प्रदिप खानविलकर, सौ.शुभांगी तेली, उमेश वायंगणकर, विठ्ठल मालंडकर, चंद्रकांत तेली, प्रकाश काळसेकर, रामगड सरपंच शुभम मठकर, महेश तेली, अरविंद वायंगणकर, दत्ताराम हिंदळेकर, श्री. शेट्ये, तालुका सचिव विशाल नेरकर आदी उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आबा तेली म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या तेली समाजाची नेहमीच एकजूट राहिलेली आहे. ती यापुढेही अधिक जोमाने वाढत राहिली पाहिजे. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणारी मंडळी कार्यरत आहेत. एआय सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आजची नवीन पिढी देखील स्पर्धेच्या युगात नवनिर्मिती करण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये देखील आपल्या समाजातील विद्यार्थी चमकले पाहिजेत. त्याचबरोबर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यात योगदान दिले पाहिजे. असे यावेळी सांगितले.

त्याचबरोबर संजय कवटकर, नंदकुमार आरोलकर, शुभांगी तेली, गणपत मालंडकर, श्री. शेट्ये, उमेश वायंगणकर, शुभम मठकर, विठ्ठल मालंडकर आदींनी आपले बहुमोल मार्गदर्शन केले.

शासकीय सेवेत कार्यरत असलेले विठ्ठल मालंडकर यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाची गरज व्यक्त करुन आज पर्सेटेज बरोबर पर्सन टाईल्स महत्वाचे आहे. १८१ हा आपल्या तेली जातीचा कोड नंबर आहे. आज समाजाची नवीन पिढी तयार होत आहे. दरवर्षी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, तसेच क्रीडा स्पर्धा घेतली. यातून सामाजिक ऐक्य भाव वाढण्यास मदत होते.

तर खानविलकर कोचिंग क्लासचे संचालक प्रदीप खानविलकर यांनी सांगितले की, आपल्या तेली समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची करियरची सुरुवात करण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यासाठी सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि मेहनत घेतली तर यश निश्चित मिळेल. आपण जे कोणतेही क्षेत्र निवडणार त्यामध्ये आवड, निवड, समाधान महत्वाचे आहे. व्यवसाय करायचा की नोकरी हे निश्चित केले पाहिजे. त्यासाठी स्मार्ट वर्क केले पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी स्वप्न, धेय्य आणि मेहनत घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी ठाम निश्चय आज आत्ताच केला पाहिजे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर आपल्या तेली समाजातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षांच्या फीमध्ये दहा टक्के विशेष सूट देण्यात येणार आहे. चांगल्या मोठमोठ्या पदांवरती व हुद्यांवरती समाजातील तरुण तरूणी पोहोचले पाहिजे हे आपले अंतिम ध्येय असल्याचे सांगितले.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि संत जगनाडे महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कणकवली तालुक्यातील तेली समाजातील दहावी, बारावी, पदवीधर आणि विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व स्पर्धांमध्ये सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थी गुणगौरव समारंभाला कणकवली तालुक्यातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय हिंदळेकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी परशुराम झगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!