सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा*

*मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी*

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते दि. 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच अनुषंगाने किनारी भागात सतर्कता बाळगावी. हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान संदेशाचे अवलोकन करून त्यानुसार संबंधित मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्था यांच्यापर्यंत तातडीने संदेश पोहोचविण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उपद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!