*कोंकण एक्सप्रेस*
*मुंबईतील गिरगाव येथे आर्यन हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा!*
*मुंबई*
कुडाळ-मालवण विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास शिवसेना नेत्या मा. मीनाताई कांबळी, उपनेत्या मा. श्रीमती आशाताई मामडी, मराठी फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. परेश तेलंग, माजी नगरसेवक मा. श्री. दिलीप नाईक, दक्षिण मुंबई सहप्रमुख मा. श्री. संतोष नलावडे, महिला विभाग प्रमुख मा. नीलम पवार तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षण, संस्कार आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निश्चितच प्रेरणादायी पाऊल आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

