लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

*कोंकण एक्सप्रेस*

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*
*सिंधुदुर्ग*
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, टिळकांनी स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा जो विचार समाजात रुजविला, तो आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्याचा मंत्र देत त्यांनी भारतीयांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. समाजहित, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार, नितीन राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!