राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे*

*या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण*

*सावंतवाडी – प्रतिनिधी*

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) हा जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची मोफत तपासणी व उपचार करणारा महत्त्वाचा शासकीय उपक्रम आहे. हा कार्यक्रम ४ प्रमुख घटकांवर (4 Ds – जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता आणि विकास विलंब) काम करतो. राष्ट्रीय बाल स्वस्त अभियान अंतर्गत वर्षातून एकदा तपासणी केली जाते.मात्र मळेवाड कोंडुरे गावातील अंगणवाड्यांचा विचार केला असता काही अंगणवाडीतील मुलांची दीड वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत तपासणी झालेली नाही असे दिसून येत आहे.तपासणी करण्यासाठी येणारे पथक हे वेळेत येत नसल्याने तपासणीपासून काही मुलं ही वंचित राहत आहेत.आज मळेवाड गावातील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी तपासणी पथक येणार होते मात्र दुपारचे बारा वाजले तरीही पथक नआल्याने त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्याकडे गाडी नसल्याने आम्हाला खाजगी गाडीने यावे लागते यामुळे उशीर होतो असे उत्तर पथकातील डॉक्टरानी दिले. पथकासाठी गाडी नाही यामुळे सर्वसामान्य मुलांची तपासणी होत नसेल तर आरोग्य यंत्रणा खरोखरच सलाईनवर असल्याचे स्पष्ट होत आहे.तसेच या पथकाने आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती मुलांना औषधोपचार केले किंवा दिव्यांग किंवा जन्मताच काही व्याधी आहे अशा किती मुलांचं तपासणी करून त्यावर कोणते उपचार करण्यात आले याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन यासर्वाची खातरजमा करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.सर्वसामान्य मुलांच्या तपासणीसाठी बाल हक्क स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत होणारी तपासणी ही रामभरोसे असून यात सुधारणा न झाल्यास या यंत्रणे विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे हे सिंधूदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयासमोर गावातील मुले व त्यांचे पालक यांच्या समवेत उपोषण येणार असल्याचा इशारा मराठे यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!