शाळा वाचवा मागणीसाठी गावराई सुकळवाड विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन

शाळा वाचवा मागणीसाठी गावराई सुकळवाड विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन

*कोंकण एक्सप्रेस*

*शाळा वाचवा मागणीसाठी गावराई सुकळवाड विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन*

*जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन*

*सिधुदुर्गनगरी २०*

शाळा वाचवा या मागणीसाठी गावराई येथील ग्रामस्थानी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी पालकांसह घेराव आंदोलन करत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसत आहे,आम्हाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही, शाळा वाचली पाहिजे, गोरगरिबांची मुले आहेत यावर्षी यावर्षी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही संस्थेला शाळा बंद करायचे आहे त्यामुळे गेली चार वर्षापासून हा प्रयत्न सुरू त्यामुळे शाळा सुरू राहावी त्याची पूर्तता व्हावी यासाठीगावरान पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनीमाध्यमिक शिक्षणाधिकारी दालनासमोर घेराव आंदोलन छेडले संबंधित संस्थेला पत्र काढा प्रत्यक्ष भेट देऊन शाळा सुरू राहिलीच पाहिजेअसा पवित्रा घेतला . यावर प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे लेखी पत्र देण्याच्या आश्वासनावर आंदोलन समाप्त झाले
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात प्रभारी शिक्षणाधिकारी व्हीएस पाटील यांची भेट घेतली सरस्वती विद्या मंदिर सुकळवाड गावराई पंचक्रोशीतील ग्रामस्थानी घेराव आंदोलन छेडले प्रकाश पावसकर, सरपंच किशोर पेडणेकर , माजी प स सभापती अजिक्य पाताडे, बाबुराव मसुरकर,गुरु परुळेकर ,अनिल पालकर, सुनील पालकर, गितांजली हिंदळेकर,गावराई उपसरपंच सतोष सामंत, राजू परुळेकर भाऊपाताडे,अजय मयेकर,अजय मयेकर, हरी वायंगणकर, प्रसाद मोरजकर सागर कुशे याचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण संस्था आणि शाळा कारभारावर लक्ष ठेवा गरीब एनटीएसटी अपंग मुलांसाठी शाळा सुरू ठेवाशाळा वाचवा मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा विविध स्लोगन पत्रके फलक झळकवण्यात आले होते .

संस्थेच्या चाललेल्या मनमानी कारभाराबाबत शाळा बंद झाल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे , सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शिकणारेमुली असून सुकळवाड, गावराई धनगरवाडी सडा पासून चार कि मी अंतरावर पायपीट करून शाळेत येतात त्यांना अन्यत्र एसटी प्रवास करून जाणे गैरसोयीचे आहे त्यामुळे ही शाळा शून्य शिक्षकी नसून २३ पटसंख्या आहे पटसंख्या असूनही शाळा बंद का करतात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर संबंधित संस्थेला पत्र पाठवावे आणि शाळा सुरू करावे संस्थेचे संस्थाचालक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असते आणि मनमानी करत असतील तर हे बाब योग्य नसून शाळा बंद करण्यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न शिक्षण विभाग यावर डोळे झाक करणार का ? असाही सवाल ग्रामस्थांनी मांडला, पाच वर्षापासून ही शाळा आहे संस्थेला बंद करण्यातच त्यांनी घाट घातला आहे लोकांचा हा प्रयत्न आम्ही हमी पडण्यासाठी गेले चार वर्षे प्रयत्न करत असल्याचे प्रकाश पावस्कर यांनी सांगितले मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जून पासून शाळा सुरू होऊ नये अजूनही आठवीच्या वर्गाला संस्थेकडून रजिस्ट्रेशन मिळत नाही याबाबत शाळा सुरूच राहिला पाहिजे असा प्रश्न ग्रामस्थांनी मांडला
सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून डोंगराळ जिल्ह्यात कमी होत चाललेले पटसंख्या आणि शासनाने काढलेल्या
धोरणात्मक निर्णयाचा फायदा ही संस्था घेत आहे त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,शाळा कशी बंद होईल या दृष्टीने संस्थेचा प्रयत्न आहे या शाळेमध्ये सांस्कृतिक सामाजिक क्रीडा विषयक कोणतेही उपक्रम घेतले जात नाही गेली चार वर्षे संस्था शाळा बंद पाडणे याच पवित्रात असल्याचे माझी सभापती अजिंक्य पाताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले, जोपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून संस्थेला लेखी पत्र काढले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आमचा पवित्र असल्याचे प्रकाश पावसकर यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊ – पालकमंत्री नितेशराणे
दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वियसहायक मनोज भोगटे यांनी संपर्क साधून गावराई सुकळवाड सरस्वती विद्यामंदिर हायस्कूल आणि संस्थेच्या या शैक्षणिक प्रश्नाबाबत लक्ष वेधले असता मुलांच्या हिताच्या दृष्टीने आपण योग्य तो निर्णय घेऊ पटसंख्येच्या शासनाने काढलेल्या अध्यादेशाबाबत फेरबदल करण्यात येत आहे या प्रश्न आपण संबंधित पालकग्रामस्थ यांच्याशी येत्या काही दिवसात भेट घेऊन चर्चा करू असे सांगितल्याचे स्वियसहाय्यक मनोज भोगटे यांनी सांगितले दरम्यान भोगटे यांनी सदर आंदोलनाची माहिती मिळतात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत गोरगरीब मुलांच्याशैक्षणिक हिताच्या दृष्टीने आणि शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी मुलांना शाळेत हजर करून घेतले जात नाही ही बाब गैर आहे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घ्या आणि प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन शाळा यावर्षी मुलाचे शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सुरु ठेवा ही बाब आपण पालकमंत्र्यांच्या कानी घालत असल्याचेही त्
यांना सांगीतले .Box
शिक्षकांची समायोजन आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची संस्थेने दखल घ्यावी. – शिक्षणाधिकारी
सरस्वती विदयामंदिर गावराई सुकळवाड येथील इ. 8 वी ते 10 वी चे वर्ग बंद करण्याचा निर्णय रदद करुन शाळा सुरु ठेवावी. अध्यक्ष / सचिव / सरपंच पंचक्रोशी शिक्षण संस्था सुकळवाड गावराई पंचक्रोशी शिक्षण संस्था सुकळवाड गावराईचे अध्यक्ष / सचिव / सरपंच तसेच आपल्या शाळेचे विदयार्थी पालक व ग्रामस्थ हे आमच्या कार्यालयात संपुर्ण जमावासह कार्यालयीन वेळेत उपस्थित राहिलेले आहेत. कारण इ. 8 वी ते 10 वी च्या विदयार्थ्यांना शाळेत बसू न दिल्याने तसेच संचमान्यतेचे कारण देऊन कारणे दाखवा नोटीसा दिल्या असून कार्यालय व शिक्षक कक्षाला कुलुप लावून तो बंद करण्यात आल्याने सर्व उपस्थितींनी आमचे कार्यालयास घेराव घातलेला आहे. वास्तविक पाहता आपण हे कृत्य करण्यापुर्वी या कार्यालयाची लेखी परवानगी घेतली नसल्याचे निर्दशनास आले आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. तथापी है सर्व कृत्य थांबवुन शाळा पुर्ववत सुरु करुन शिक्षकांना या कार्यालयाची जोपर्यंत लेखी सुचना मिळत नाही तोपर्यतशाळा सुरू ठेवावे
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम क्र. २६ नुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनाचे कामकाज अदयाप पुर्ण झालेली नाही. तरी पुनश्च आपणास ताकीद देण्यात येत आहे कि, शासन नियमानुसार आपल्या शाळेतील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन होईपर्यंत तसेच प्रशालेतील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणेत यावी. आणि शाळेचा मुख्याध्यापकांचा सहयांचे अधिकाराच्या मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी पत्र दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!