मनसेच्या इन्कमिंगला जोरदार सुरुवात; फुकेरी येथे युवकांचा पक्षप्रवेश

मनसेच्या इन्कमिंगला जोरदार सुरुवात; फुकेरी येथे युवकांचा पक्षप्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*मनसेच्या इन्कमिंगला जोरदार सुरुवात; फुकेरी येथे युवकांचा पक्षप्रवेश..*

*दोडामार्ग :शुभम गवस*

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोडामार्ग तालुक्यातील संघटनात्मक बांधणीला वेग येत असून, फुकेरी येथील हनुमंत गडावर आयोजित कार्यक्रमात शेकडो युवकांनी मनसेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय कुबल व माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या महाराष्ट्र विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण पक्षात प्रवेश करत असल्याची भावना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका नेतृत्वाच्या आदेशानुसार हा प्रवेश सोहळा पार पडला.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी हनुमंत गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पक्षासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली. “जय भवानी, जय शिवाजी” तसेच मनसेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या उत्साहपूर्ण वातावरणामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी नितीन देसाई, नवलू झोरे, रुपेश झोरे, आशिष कुबल, अनुराग रेडकर, संदेश सावंत, अर्जुन धुरी यांच्यासह अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
यावेळी माजी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय कुबल यांनी सांगितले की, “दोडामार्ग तालुक्यात मनसेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, येत्या काळात आणखी मोठा आणि भव्य पक्षप्रवेश होणार आहे. तालुक्यातील अनेक युवक मनसेच्या विचारांशी जोडले जात असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!