वैभववाडी तालुक्याचे सभापती मा. श्री .सिद्धेश (बंटी) दिलीप रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

वैभववाडी तालुक्याचे सभापती मा. श्री .सिद्धेश (बंटी) दिलीप रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी तालुक्याचे सभापती मा. श्री .सिद्धेश (बंटी) दिलीप रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण*

*वैभववाडी: प्रतिनिधी*

सर्वत्र १५ जून रोजी नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली. या पार्श्वभूमीवर आचिर्णे येथे विद्यामंदिर आचिर्णे नं 1 शाळेत नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच वैभववाडी तालुक्याचे सभापती सन्माननीय श्री सिद्धेश (बंटी)दिलीप रावराणे,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी वैभववाडी तालुक्याचे सभापती सन्माननीय श्री सिद्धेश दिलीप रावराणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रभाकर गुरव , तसेच श्री वासुदेव रावराणे-सरपंच आचिर्णे, श्री सुहास सावंत जलसंधारण अधिकारी ल पा वैभववाडी, मुख्याध्यापक श्री वैभव तळेकर सर , सहकारी शिक्षक राहुल अस्पतवार सर, अंगणवाडी सेविका श्रीम स्नेहा रावराणे, श्रीम. स्नेहल रावराणे श्री अमर सावंत, श्रीम रोहिणी रावराणे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!