*कोंकण एक्सप्रेस*
*”नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत लाभार्थी यांना मोफत चष्मा वाटप*
*शिरोडा : प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्त “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” २९ सप्टेंबर २०२५ रोजी मा.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तपासणी शासकीय नेत्रपेढी जिल्हा रुग्णालय ओरोस यांच्या सहकार्यातून मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिरोडा उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता
त्या वेळी ज्यांनी आपली नेत्रतपासणी केली होती त्या लाभार्थी यांचे चष्मे प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे उपलब्ध झाल्यानंतर आज शनिवार दि १ आँगस्ट २०२६ रोजी शिरोडा भाजप कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते चष्मा वाटप कार्यक्रम भाजप शिरोडा युवा मोर्चा यांने आयोजित केला होता
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजप,वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी केले या वेळी भाजप,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी आपले या कार्यक्रमा अंतर्गत विचार मांडले
या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी,तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी,वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे,शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर,वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सदस्य सोमाकांत सावंत,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा बूथ क्र.८१ अध्यक्ष अभय बर्डे,शिरोडा बूथ क्र.८५ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर,वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा पदाधिकारी अनुक्रमे.गंधाली करमळकर,समृद्धी धानजी,स्नेहा गोडकर,पल्लवी नाईक,आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी बाळू वस्त,भाजप शिरोडा पदाधिकारी अनिल गावडे,तुषार म्हाकले तालुका पदाधिकारी भाजप मारुती दोडशानट्टी, या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा शिरोडा भाजप युवा नेता संतोष धानजी उपस्थित होते
त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,भाजप वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर,वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक प्रितम सावंत भाजप पदाधिकारी तुषार साळगांवकर,माजी शिरोडा सरपंच विजय पडवळ यांनी भेट दिली.
“नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत नेत्रतपासणी केली ते लाभार्थी ४८ जण या मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना वरील मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.

