विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे ज्ञानमंदिरातील पहिले पाऊल शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे ज्ञानमंदिरातील पहिले पाऊल शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे ज्ञानमंदिरातील पहिले पाऊल शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*

*कणकवली : संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव थाटात साजरा करण्यात आला इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी नंतर १५ जून २०२६ रोजी राज्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरू करण्यात आल्या शाळेचा प्रारंभ मोठ्या आनंदात व थाटात साजरा करण्यात आला ज्ञानमंदिराचा परिसर सुशोभित . करून सर्वत्र सुंदर अशा रांगोळ्या रेखाटून शालेय वातावरण प्रसन्न करण्यात आले होते शाळेच्या बाह्य फलकावर कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी कलात्मक रेखाटन करून शाळेचे वातावरण उत्साही तयार केले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री वळंजू साहेब व विश्वस्त श्री डेगवेकर साहेब या मान्यवरांच्या हस्ते नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले तसेच पुस्तके वितरण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून कौतुक केले मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी शाळेची शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन करून नविन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी शालेय उपक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यायावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!