असलदे गावाने अवैध दारु विक्री विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं कौतुक

असलदे गावाने अवैध दारु विक्री विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं कौतुक

*कोंकण एक्सप्रेस*

*असलदे गावाने अवैध दारु विक्री विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं कौतुक*

*अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल ; असलदे – नांदगाव ग्रामस्थांनी अवैध दारु विरोधात अशीच एकजूट ठेवावी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

असलदे गावात अवैध दारु विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आहे. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि तरुण पिढीच्या हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.

असलदे – नांदगाव गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,सोसायटी चेअरमन भगवान लोके,कमलेश पाटील,राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

असलदे गावामध्ये गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. ग्रामस्थांनी संबंधित विक्रेत्यांना जाब विचारत गावात अशा प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी समाज दारु विक्री करणाऱ्यांना दिली होती.
या पार्श्वभूमीवर गावाच्या हितासाठी नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणे आवश्यक आहे. असलदे गावातील ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन आहे. गावचे सरपंच चंद्रकांत डामरे ,पत्रकार भगवान लोके यांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!