*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली नगरपंचायतीच्या धोकादायक इमारतीबाबत व्यापारी आक्रमक; पालकमंत्री नितेश राणे यांचीही घेणार भेट!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आज दिनांक 15/06/2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश जी पारकर यांची भेट घेतली,
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी समस्त व्यापारी बांधवांन सोबत दोन तास चर्चा केली, या चर्चेत अनिल मेस्त्री, राजु म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिल भाई कुरेशी, प्रभाकर कदम, यांनी विषेशतः सहभाग घेतला,
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सर्वांना नव्याने व्यापारी संकुलण उभारणी करताना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले, तसेच सर्वांना आश्वासन दिले की नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलणा मध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा आपण पर्यंत करू असे म्हटले,
उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन दिले, या निवेदनात असे म्हटले आहे की
कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती पडल्या आहेत,
तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे, या मध्ये एकुण 13 + पहिल्या मजल्यावर 3 + 1 पत्रा शेड असे एकूण 17 गाळे धारक आहेत,
त्याचप्रमाणे 36 खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत,
तसेच महसूल च्या जागेत 11 खोके धारक आहेत,
त्याचप्रमाणे 10/15 वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे व्यवसाय करत आहेत , त्यांचा ही विचार केला जावा
तरी आपणास विनंती आहे की आपण प्रत्यक्षात पाहणी करून लवकरात लवकर या जागेवर नवीन व्यापारी संकुलण उभारणी करावे, आणि आम्हाला नवीन व्यापारी संकुलना मध्ये समाविष्ट करून घ्यावे, ही नम्र विनंती आहे
सामाजिक कार्यकर्ते आणि गाळे धारक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आभार मानले, पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या
यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे म्हटले आहे की, आज आम्ही नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले, तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नितेश जी राणे साहेब यांची भेट घेतली होती, सर्व व्यापारी बांधवांच्या उपस्थिती येत्या काही दिवसांत पालकमंत्री नितेश जी राणे साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहोत.
*सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर, भगवान कासले, राम सुर्यवंशी, महेश वायगंणकर, प्रभाकर कदम, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर, जाधव, नुरूभाई, निखार्गे , महाडिक, भारती फाटक, आदी बहुसंख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते
यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले

