श्री. उमेश गाळवणकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मा.आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

श्री. उमेश गाळवणकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मा.आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. उमेश गाळवणकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मा.आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा*

बॅ. नाथ पै. शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष तसेच के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री.उमेश गाळवणकर यांचा ५० वा वाढदिवस काल रात्रौ बॅ.नाथ पै. शिक्षण संस्थेच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री. उमेश गाळवणकर यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, गेली अनेक वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि कुठलाही भेदभाव न करता उमेश गाळवणकर यांच्या माध्यमातून भरीव असे समाजकार्य सुरू आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. उमेशजींचे मंत्रालयातही वेगळे वजन असून त्यांना कधी राजकीय पक्षांच्या ताकदिची गरज भासली नाही,आणि यापुढेही ती भासणार नाही. बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचाही नावलैकिक तेवढाच आहे. या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. अनेक समाजपयोगी कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात पार पडतात. आणि उमेशजींच्या कार्यात त्यांच्या पत्नीचेही मोलाचे सहकार्य असते. अशाच प्रकारे उमेशजींच्या कार्याची उंची वर्षानुवर्षे वाढत राहो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शब्दात वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!