*कोंकण एक्सप्रेस*
*उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब यांची घेतली भेट*
*सिलिंडर बुकिंग 25 दिवसानंतर ची नवीन पध्दत बदलून पूर्वी प्रमाणे बुकिंग पध्दत अमलात आणावी, तसेच पुर्वी प्रमाणे वर्षाला मिळणारे 15 सिलिंडर मिळावे*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आज दिनांक 08/06/2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन दिले,
सामान्य नागरिक आज गॅस सिलिंडर
वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून, बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती नाही,
घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस कार्यालयात तासनतास लाइन मध्ये ऊभे राहून सिलिंडर वाहनासाठी जादा पैसे खर्च करून घरी आणा लागतोय, आधीच सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेला आहे,
*पर्वी प्रत्येक गॅस धारकांना वर्षा ला 15 सिलिंडर घरपोच पोच मिळत होते, आज नव्या नियमानुसार 25 दिवसानंतर नविन बुकिंग करता येते, पण हिशोबने ट्याग नंबर येई पर्यंत 30 दिवस होतात, त्यानंतर आठवड्याने गाडी घरपोच पोच आली तर ठीक नाहीतर चलो गॅस एजन्सी, या हिशोब ने सामान्य नागरिकांना वर्षाला 9 सिलिंडर पण मिळणे अशक्य आहे,
*खडे गावातील नागरिकांना 45 दिवसानंतर नवीन बुकिंग म्हणजे खेडे गावातील लोक जेवण करत नाहीत ❓, एक तर जंगलतोड लागू आहे, मग त्यांनी जगायच नाही,
*आता म्हणाल गॅस तुटवडा आहे, पण अनुभवले ली वस्तूस्थिती अशी आहे की काळ्या बाजारात घरगुती सिलिंडर 2200 रूपये आणि व्यावसायिक सिलिंडर 3200 रूपये अगदी बिनधास्तपणे विकला जातोय, हे सिलिंडर पाहिजे तेवढे मिळतात, मग सिलिंडर तुटवडा कसा म्हणता येईल,
*तसेच पुर्वी प्रमाणे सिलिंडर वाहणे सुध्दा बुकिंग केल्या नंतर 15 / 15 दिवस झाले तरी घरपोच सिलिंडर मिळत नाहीत, बुकिंग केल्या वर गॅस कार्यालयातून बुकिंग रद्द करण्यात आल्याचे मोबाईल वर मेसेज येतात, म्हणजे पुन्हा नव्याने बुकिंग करा, सामान्य नागरिक हैराण झाले ला आहे,
*सिलिंडर तुटवड्या च्या नावाखाली काळाबाजार चालत असेल तर मग पुर्वी प्रमाणेच गॅस कार्ड धारकांना वर्षाला 15 सिलिंडर मिळाले पाहिजेत, आणि हॉटेल व्यावसायिकांना सरकारी भावाने जोपर्यंत सिलिंडर मिळणार नाहीत, तो पर्यंत तो तरी काय करू शकणार नाही, आणि सिलिंडर चा काळाबाजार करणार्यांची चौकशी करु योग्य ती कारवाई करण्यात यावी,
*आज सामान्य कामगार वर्ग वडापाव नाष्टा करायला गेला तर तो ही 10 रुपये वरुन २0 रूपये झाला, मच्छी जेवण 150 रूपये वरून 250 रुपयावर गेलेले आहे, याचे कारण हॉटेल मालकच उघड पणे सांगतात काय करणार 3200 देऊन सिलिंडर खरेदी करतो, या सर्वांचा परिणाम सामान्य नागरिक, सामान्य कामगार वर्ग यांच्या वरच पडतो,
*आज सर्व साधारण एक घरगुती सिलिंडर 21 ते 22 दिवस येतो, वर्षा कमीत कमी 15 सिलिंडर लागतात, त्यामुळे च पूर्वी प्रमाणे 15 सिलिंडर मिळावे, हीच शासन दरबारी विनंती*
*त्याच प्रमाणे 25 दिवसांनी नवीन सिलिंडर बुकिंग ही नवीन पध्दत बदलून, पुर्वी प्रमाणे बुकिंग पध्दत अमलात आणावी*
*तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाने वेळी च लक्ष द्यावे , आणि सामान्य कामगार, नागरिकांना दिलासा द्यावा, वेळी च शासन दरबारी सामान्य नागरिकांच्या व्यथा मांडावीत, ही नम्र विनंती

