कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणांची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; ‘ती’ बांधकामे स्वतःहून हटवा, अन्यथा जेसीबी चालणार!

कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणांची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; ‘ती’ बांधकामे स्वतःहून हटवा, अन्यथा जेसीबी चालणार!

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणांची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; ‘ती’ बांधकामे स्वतःहून हटवा, अन्यथा जेसीबी चालणार!*
​*नगरपंचायत पथकाचा व्यापाऱ्यांना सक्त इशारा; पटवर्धन चौकापासून मोहिमेला सुरुवात*
*कणकवली: प्रतिनिधी*

कणकवली बाजारपेठेतील गटार लाईनवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे त्वरित हटवा, अन्यथा नगरपंचायतीतर्फे जेसीबीद्वारे ती पाडली जातील, असा जाहीर आणि सक्त इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी आज व्यापाऱ्यांना दिला.
​कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहरात ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून आज (गुरुवारी) मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमण हटाव पथकासह बाजारपेठेत प्रत्यक्ष उतरून पाहणी केली. कणकवलीतील प्रसिद्ध पटवर्धन चौकापासून या पाहणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
​नगरपंचायत प्रशासनाने आधीच मार्किंग केलेल्या गटार लाईनच्या हद्दीत अनेक व्यापाऱ्यांनी बांधकामे केली असून काहींनी छपऱ्या पुढे काढल्या आहेत. आजच्या मोहिमेदरम्यान प्रशासनाने थेट कारवाई केली नसली, तरी संबंधित व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना ही अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
​”व्यापाऱ्यांनी गटार लाईन मधील आपली बांधकामे आणि दुकानांची वाढीव छप्परे तात्काळ हटवून घ्यावीत. या सूचनेनंतरही जर अतिक्रमणे काढली नाहीत, तर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जेसीबीद्वारे कारवाई केली जाईल.”
— गौरी पाटील, मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत.
​या पाहणी मोहिमेदरम्यान मुख्याधिकाऱ्यांसोबत प्रशासन अधिकारी अमोल अगम, अक्षता रोळे, प्रशांत राणे, मनोज धुमाळे, संतोष राणे आणि विभव करंदीकर यांच्यासह नगरपंचायतीच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बाजारपेठेतील अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!