*कोंकण एक्सप्रेस*
*तिरुपती बालाजींच्या चरणी नारायण राणे यांनी टेकले माथा; कुटुंबीयांसह घेतले मनोभावे दर्शन*
*तिरुपती*
आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान येथे आज केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री. नारायणराव राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. श्री. नारायणराव राणे यांनी श्री वेंकटेश्वर बालाजींचे मनोभावे दर्शन घेऊन विशेष पूजा-अर्चना केली आणि राज्याच्या व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या धार्मिक भेटीदरम्यान राणे कुटुंबीयांनी बालाजींच्या पवित्र वातावरणात काही वेळ व्यतीत केला. या भेटीचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर होताच भाविकांनी ‘गोविंदा’च्या जयघोषाने कमेंट्सचा वर्षाव केला आहे

