*कोंकण एक्सप्रेस*
*संत आजमेळा वारीत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सहभाग; फलटण ते बरड १८ किमी पायी प्रवास*
*फलटण*
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज संत आजमेळा वारीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी फलटण ते बरड असा सुमारे १८ किलोमीटरचा पायी प्रवास करून विठ्ठल नामाचा गजर केला.

या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर मनीष दळवी यांनी वारकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. वारीच्या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि भक्तीमय वातावरणाचे कौतुक करतानाच, वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबतही त्यांनी विचारपूस केली. मनीष दळवी यांचे या वारीतील उपस्थिती पाहून वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

