*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली-भेडशी केंद्रशाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश*
*दोडामार्ग : शुभम गवस*
तालुक्यातील साटेली-भेडशी पूर्ण प्राथमिक शाळेने ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. इयत्ता चौथीच्या परीक्षेला बसलेल्या २२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुशी सत्यवान धर्णे हिने २७४ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच इयत्ता सातवीतील फटीराज राकेश धर्णे याने १५० गुण मिळवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पूनम पालव, शिक्षक दीपक दळवी, नूतन शिंदे तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. साटेली-भेडशी केंद्रप्रमुख तथा गटसमन्वयक/विस्तार अधिकारी दोडामार्ग सूर्यकांत नाईक यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

