*कोंकण एक्सप्रेस*
*केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले उद्या गोवा दौऱ्यावर..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
रामदास आठवले हे बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी गोवा दौऱ्यावर येत असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.)चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता मोपा-पेडणे येथील गोवा विमानतळावर डॉ. आठवले यांचे आगमन होणार असून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर गोव्यात आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून पणजी येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आर.पी.आय.चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा संघटक ॲड. एस. के. चेंदवणकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, जिल्हा खजिनदार आनंद पेंडूरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ. ज्योती रमाकांत जाधव, जिल्हा उपाध्यक्षा सौ. जागृती सासोलकर, जिल्हा सरचिटणीस सौ. निताली कांबळे, सहसचिव सौ. प्रगती कांबळे तसेच जिल्हा खजिनदार सौ. समिधा निगुडकर यांनी केले आहे.

