सिंधुदुर्ग पर्यटन विकासात सुवर्णपान; बहुप्रतिक्षित ‘ताज’ हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा :विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

सिंधुदुर्ग पर्यटन विकासात सुवर्णपान; बहुप्रतिक्षित ‘ताज’ हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा :विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग पर्यटन विकासात सुवर्णपान; बहुप्रतिक्षित ‘ताज’ हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा :विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ*

*मालवण ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे. राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांमधून अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या ताज हॉटेल (इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड – IHCL) प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेऊन मंत्रालय येथे त्रिपक्षीय करार पार पडला स्थानिक जमीनधारकांना समाविष्ट करून त्यांना अपेक्षित भूमिका राज्य सरकारने घेतली हे समाधानकारक आहे.
खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला होता आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या दूरदर्शी संकल्पनेतील एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘ताज’ हॉटेल प्रकल्प आता प्रत्यक्षात मार्गी लागत आहे.
हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. आजचा हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना व्यक्त होत आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन पॉलिसी’ (उलटे स्थलांतर) संकल्पनेसाठी हा ताज हॉटेल प्रकल्प एक महत्त्वाचा माईलस्टोन (मैलाचा दगड) ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातून बाहेर गेलेल्या तरुणांना आपल्याच भागात उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पुन्हा माघारी येण्यासाठी मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाच्या आगमनाचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने विष्णू मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.यां या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आकर्षित होतील.ताज’ सारख्या जागतिक ब्रँडच्या आगमनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन क्षेत्रात अधिक वेगाने अग्रेसर होईल.या प्रकल्पांमुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना, हॉटेल व्यावसायिकांना तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.असे मत विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!