सिंधुदुर्ग नगरीत आज ‘सिधुदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग नगरीत आज ‘सिधुदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग नगरीत आज ‘सिधुदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन*

*सिधुदुर्गनगरी*

जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकारगृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन आज १७ मे रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील पत्रकाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले आहे

या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन नंतर सिंधुदुर्ग नगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे या सोहळ्यात पत्रकारांच्या कौटुंबिक यशाचा ही सन्मान केला जाणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे ज्या पत्रकारांचे पाल्य उत्तीर्ण झाले आहे त्यांनी आपली नावे त्वरित जिल्हा पत्रकार संघाकडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे ,स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी विविध लोककला गुणदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे लोककला सादरी करण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे आगाऊ कळविणे आवश्यक आहे या दोन्ही कार्यक्रमांमध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्याने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!