चित्रकला स्पर्धेत बालगटात उर्वी रावले व हस्ताक्षर स्पर्धेत सामवेद लाड प्रथम

चित्रकला स्पर्धेत बालगटात उर्वी रावले व हस्ताक्षर स्पर्धेत सामवेद लाड प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*चित्रकला स्पर्धेत बालगटात उर्वी रावले व हस्ताक्षर स्पर्धेत सामवेद लाड प्रथम*

*सुखशांती मंडळाचा स्तुत्य उपक्रम*

*शिरगाव : संतोष साळसकर* 

देवगड तालुक्यातील साळशी–सरमळेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त सुखशांती मंडळाच्या वतीने ‘मुक्तांगण’ या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यामध्ये चित्रकला स्पर्धेत बालगटात उर्वी रावले हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमार गटात मुक्ती लाडगावकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात सामवेद लाड प्रथम आला, तर कुमार गटात हर्षिता दुखंडे हिने प्रथम क्रमांक संपादन केला.

तसेच बालगटात सर्वेश रावले, साईशा मुंबरकर, आरोही रावले, तृशांक मिराशी, गार्गी रावले, सेजल रावले, रुद्र रावले, समर्थ रासम, अद्विक रावले, स्वयंम रावले व रत्नेश मिराशी तसेच कुमार गटातील साईशा लाडगावकर, तस्मी लाडगावकर, गार्वी दुखंडे, सारा रावले व प्रिन्स बोडवे यांनाही सहभाग घेतल्याबदद्ल बक्षिसे प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. ही बक्षिसे किशोर रावले व संतोष रावले बंधूंनी दिली होती.

यावेळी सुखशांती मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!