गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने विद्यालयात उत्साहाचे वातावरण

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने विद्यालयात उत्साहाचे वातावरण

*कोंकण एक्सप्रेस*

*गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने विद्यालयात उत्साहाचे वातावरण*

*दोडामार्ग : शुभम गवस*

पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच प्रथम तीन क्रमांकासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. अनिल गवस, दोडामार्ग तालुका मुंबई विकास मंडळाचे कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक अशोक आंबूलकर, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. पूर्वा गवस यांनी केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!