*”सभापती आपल्या दारी” उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यात नागरिकांच्या समस्या थेट सोडविण्याचा प्रयत्न*

*”सभापती आपल्या दारी” उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यात नागरिकांच्या समस्या थेट सोडविण्याचा प्रयत्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*”सभापती आपल्या दारी” उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यात नागरिकांच्या समस्या थेट सोडविण्याचा प्रयत्न*

*दोडामार्ग / शुभम गवस*

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी जाऊन ऐकून त्वरित तोडगा काढण्याच्या उद्देशाने पंचायत समिती दोडामार्गने “सभापती आपल्या दारी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होणार असून, गावपातळीवरील प्रश्नांना थेट न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमांतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध गावांमध्ये सभापतींसह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या अडचणी, प्रलंबित कामे तसेच विकासाच्या गरजांवर थेट चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि जबाबदारी अधिक प्रभावीपणे समोर येणार आहे.
नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
७ मे २०२६ – मणेरी गण (ग्रामपंचायत मणेरी), सकाळी ११ वाजता
८ मे २०२६ – कोलझर गण (ग्रामपंचायत कोलझर), सकाळी ११ वाजता
२१ मे २०२६ – झरेबांबर गण (ग्रामपंचायत झरेबांबर), सकाळी ११ वाजता
२२ मे २०२६ – माटणे गण (ग्रामपंचायत माटणे), सकाळी ११ वाजता
२८ मे २०२६ – कोनाळ गण (ग्रामपंचायत कोनाळ), सकाळी ११ वाजता
२९ मे २०२६ – साटेली-भेडशी गण (ग्रामपंचायत साटेली-भेडशी), सकाळी ११ वाजता
या उपक्रमामुळे गावोगावी प्रलंबित प्रश्नांवर थेट सुनावणी होणार असून, रस्ते, पाणी, आरोग्य, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!