*कोंकण एक्सप्रेस*
*कास नं. १ शाळेत ‘मीच माझी’ काव्यसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन….*
*सावंतवाडी : शुभम गवस*
ता. सावंतवाडी येथील कास नं. १ शाळेत बालकवयित्री कु. गौरी राजन गावडे यांच्या ‘मीच माझी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विठ्ठल पंडित होते.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. लक्ष्मीदास ठाकूर, जि.प. सदस्य श्री. नितीन राऊळ, पं.स. सदस्य श्री. महेश धुरी, सरपंच श्री. प्रवीण पंडित, पोलीस पाटील श्री. प्रशांत पंडित तसेच प्राध्यापक श्री. महेश पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक श्री. विठ्ठल कदम, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्री. भरत गावडे तसेच विश्वकोश साहित्य मंडळाचे सदस्य श्री. म. ल. देसाई उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून बालवयातच काव्यलेखनाची आवड जोपासणाऱ्या कु. गौरी गावडे यांचे विशेष कौतुक केले. श्री. विठ्ठल कदम यांनी साहित्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली, तर श्री. भरत गावडे यांनी विद्यार्थ्यांनी वाचन आणि लेखनाची सवय लावावी असे मार्गदर्शन केले. श्री. म. ल. देसाई यांनी ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जि.प. सदस्य श्री. नितीन राऊळ आणि पं.स. सदस्य श्री. महेश धुरी यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास उपसरपंच श्रीम. श्रेया राणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीम. काव्या पंडित, श्री. अमोल देसाई, कास विकास मंडळाचे सभासद, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम. शिल्पा गोठोस्कर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. उत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.

