नाना शंकरशेठ पुण्यतिथीनिमित्त आज कणकवली येथे अभिवादन कार्यक्रम; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन

नाना शंकरशेठ पुण्यतिथीनिमित्त आज कणकवली येथे अभिवादन कार्यक्रम; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*नाना शंकरशेठ पुण्यतिथीनिमित्त आज कणकवली येथे अभिवादन कार्यक्रम; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन*

*कणकवली : प्रतिनिधी*

लोकशिक्षणाचे जनक, शिक्षणप्रेमी, समाजसेवक आणि दानशूर उद्योजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकरशेठ (नाना शंकरशेठ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने आज शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता अमित मंगल कार्यालय, देवी चौडेश्वरी मंदिर शेजारी, कणकवली येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कणकवली तालुक्यातील सर्व सुवर्णकार बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नाना शंकरशेठ यांनी शिक्षण, समाजसेवा आणि लोककल्याण क्षेत्रात दिलेले योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, जीवनकार्यावरील व्याख्याने, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने होणार आहे. हा कार्यक्रम डॉ. विनायक विष्णू शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी गजानन बापूराव महाजन, निकेत नरहरी पावसकर आणि सौ. सुप्रिया संतोष महाजन हे नाना शंकरशेठ यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान देतील. तसेच देवज्ञ हितवर्धक समाज, देवज्ञ महिला मंडळ आणि देवज्ञ युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि पाककला स्पर्धेच्या निकालाची घोषणाही यावेळी होणार आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संजय मधुकर कामतेकर मार्गदर्शन करणार असून व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक रामचंद्र बेलवलकर यांचे विशेष मनोगत होईल.

समाजातील एकोपा, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास सर्व सुवर्णकार बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष मोहन सदानंद तळगांवकर व चिटणीस सिद्धेश सूर्यकांत डिंगसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!