पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते*

*महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक ३० (जिमाका) :-†

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.

ध्वजारोहणानंतर 8.25 वाजता पोलीस दल व राखीव पोलीस दलाचे संचलन होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालये अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सभारंभासाठी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सकाळी 7.45 वाजेपर्यंत आपापल्या जागांवर स्थानापन्न व्हावे, तसेच राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!