*कोंकण एक्सप्रेस*
*श्री देव केळोबा मंदिर झर्येवाडी फोंडाघाट या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*
*दि. 30 एप्रिल पासून 3 मे पर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये 30 एप्रिल रोजी*
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी नवजीवन ब्लड सेंटर कणकवली यांचे सहकार्य लाभले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप इस्वलकर, खजिनदार संतोष बाणे त्याचबरोबर मंडळाचे माजी अध्यक्ष रामदास भोगले, सचिव गणेश इस्वलकर, पांडुरंग बाणे, निलेश बाणे, रमेश इस्वलकर, दत्तात्रय धुरी, मंडळाचे कार्यकर्ते शुभम भोगले, साई भोगले, गणेश भोगले, महेश इस्वलकर, मयुर इस्वलकर, यांचे सहकार्य लाभले.
यावेळी दिलीप इस्वलकर यांनी मनोगत व्यक्त करताना मंडळाचा यावर्षी रक्तदान शिबीर हा नाविन्यपूर्ण व नवीनच उपक्रम असून पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या प्रमाणात अश्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य मंडळातर्फे केले जाईल असे सूचित केले. व उपस्थिताचे आभार व्यक्त केले.

