आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*

*कणकवली : संजना हळदिवे*

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव श्री. ई. रवींद्रन, सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकारी सौ. तृप्ती धोंडमिस, आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साई धुरी यांनी आज कणकवली येथील आमदार तथा मंत्री श्री. नितेश राणे यांच्या ‘ओम गणेश’ या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधा आणि आगामी विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर करावयाच्या उपाययोजनांवर याप्रसंगी चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!