*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधि*
कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भिरवंडे गावचे सुपुत्र सध्या राहणार पुणे सन्माननीय कर्नल विजय भालचंद्र सावंत( निवृत्त )
यांनी 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 रोजी इंग्रजी विषय व्याकरण विषयक मार्गदर्शन केले. कर्नल विजय सावंत यांचे माध्यमिक शिक्षण कुर्ला मुंबई त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. शिक्षण घेत असतानाच खडकवासला पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( नॅशनल डिफेन्स अकॅडमी ) येथे त्यांची निवड झाली तीन वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर देहरादून इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर ऑगस्ट 1964 मध्ये सैन्यात भरती झाले. सैन्यात असताना तोफखाना विरोधी कोर मध्ये त्यांनी काम केले. सेवेत असतानाच त्यांनी मद्रास विद्यापीठातून एम एस सी इन डिफेन्स स्टडी व पुणे विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज अभ्यासक्रम पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी सैन्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. शिकण्याचे आणि शिकवण्याची जबरदस्त आवड असून वेगवेगळ्या कॉलेजेस व माध्यमिक विद्यालयात जाऊन इंग्रजी भाषा शिकवण्याचे ते काम करत आहेत. या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान देऊन त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व प्रतिपादित केले. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आभार कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे हितचिंतक दत्ताराम सावंत यांनी आभार मानले.

