*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली भेडशी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक भरतीची मागणी; नियुक्ती न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा*
*दोडामार्ग,: शुभम गवस*
साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे चालक पद काही महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भार वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला निवेदन देत २० एप्रिलपर्यंत नियुक्तीची मुदत दिली आहे. अन्यथा तालुका आरोग्य केंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

