*कोंकण एक्सप्रेस*
*श्री देव पाचोबा मित्रमंडळ डामरे-फोंडाघाट आयोजित श्री रामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रील स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न!*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
श्री देव पाचोबा मित्रमंडळ डामरे-फोंडाघाट आयोजित श्रीरामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, आर्ट्स, कॉमर्स कॉलेज येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेते संजयजी आग्रे, सरपंच सौ. संजना आग्रे, फोंडाघाट कॉलेजचे चेअरमन श्री. राजू पटेल, संचालक श्री. संदेश पटेल, प्रशालेचे मुख्यध्यापक पारकर सर, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरे सर, माजी संचालक सुंदर पारकर गुरुजी, ग्राम पंचायत सदस्य पवन भोगले, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, संचालक रंजन नेरुळकर, सोसायटी चेअरमन राजन नानचे, संतोष जोईल सर, रिल स्टार शुभम देसाई, अवंतिका सावंत, श्री राजू राणे, अजित नाडकर्णी व यामिनी आग्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
🗣️ यावेळी शिवसेना उपनेते संजयजी आग्रे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आजच्या डिजिटल युगात युवकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून आपल्या कला, कौशल्य आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. श्री रामनवमीसारख्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे समाजात चांगला संदेश जात असून आयोजकांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
🥇 प्रथम क्रमांक – निखिल नाईक (कणकवली-कलमठ)
🥈 द्वितीय क्रमांक – सचिन वाघेश्री (कणकवली-कलमठ)
🥉 तृतीय क्रमांक – सिद्धेश चव्हाण (मालवण)
🏅 उत्तेजनार्थ पारितोषिके –
• विराज ढवण (फोंडा)
• निक तांबे (आंब्रड)
विजेत्यांना अनुक्रमे
💰 प्रथम – ₹15,555/- चषक व प्रशस्तीपत्रक
💰 द्वितीय – ₹7,555/- चषक व प्रशस्तीपत्रक
💰 तृतीय – ₹3,555/- चषक व प्रशस्तीपत्रक
💰 उत्तेजनार्थ (प्रत्येकी) – ₹1,500/- चषक व प्रशस्तीपत्रक
अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला असून, स्पर्धकांच्या उत्तम प्रतिसादामुळे श्री देव पाचोबा मित्रमंडळ आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

