गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्वल प्रसाद मसुरकर राज्यात प्रथम.

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्वल प्रसाद मसुरकर राज्यात प्रथम.

*कोंकण एक्सप्रेस*

*गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्वल प्रसाद मसुरकर राज्यात प्रथम*

* गुजरात येथील सायन्स सिटी आणि इस्रो सेंट्रलला होणार विमान सफर*

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कुमार प्रज्वल प्रसाद मसुरकर याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत प्रज्वल मसुरकर याने ९८.००% (३००पैकी २९४ गुण) प्राप्त करून इयत्ता पाचवी इयत्तेमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्कॉलरशिप परीक्षा धर्तीवर आधारित ही स्पर्धा परीक्षा राज्यपातळीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे या उद्देशाने दरवर्षी आयोजित केली जाते.

प्रज्वल मसुरकर याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून गुजरात सायन्स सिटी आणि इस्रो सेंट्रल येथे विमान सफरीने भेट देण्यासाठी निवड झाली आहे. तसेच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्राचा देखील मानकरी ठरला असून संपूर्ण कोकणातून प्रज्वल हा पहिलाच राज्यपातळीला झेप घेणारा विद्यार्थी ठरला आहे.

या आधी देखील प्रज्वल याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा, बी डी एस, मंथन, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे.

प्रज्वल याला प्रशालेतील वर्गशिक्षिका सौ प्रांजली मसुरकर, सौ गावकर मॅडम, के पी सावंत सर, मुख्याध्यापक सुनिल गावकर, केंद्रप्रमुख भोगले सर तसेच कनेडी हायस्कूलचे शिक्षक पी एन मसुरकर सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले असून कुमार प्रज्वल याच्या या सुवर्णमय यशानिमित सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!