*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठ प्रबुद्ध नगरमध्ये उद्या भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव*
*कणकवली ः संजना हळदिवे*
प्रशिक बौध्द सेवा संघ कलमठ व अवंतिका सखी, समता व आम्रपाली स्वयंसहाय्यता समूह कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने 18 एप्रिल रोजी तथागत भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव समाजमंदिर कलमठ प्रबुध्दनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी 9 वा. पंचशील ध्वजारोहण व बुध्द पूजापाठ, 10 ते 12 वक्तृत्व स्पर्धा गट पहिली ते बारावी, रात्रौ 8.30 वा. जाहिर अभिवादन सभा होणार असून सभेचे अध्यक्ष प्रशिक बौध्द सेवा संघाचे अध्यक्ष नंदकुमार कासले हे असणार असून यावेळी जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य गुरू वर्देकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रा. पं. सदस्य श्रेयस चिंदरकर, इफत शेख, नजराना शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्रध्दा कदम तसेच सुनील कदम उपस्थित राहणार आहेत. रात्रौ 10 वा. बुध्द भीमगीते व रेकॉर्ड डान्स व हिंदी, मराठी गीतांचा नजराना भीमजल्लोष हा कार्यक्रम होणार आहे. तसेच जयंतीच्या पूर्वसंध्येला 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. महिला, मुले, मुली व पुरूषांसाठी विविध फनीगेम्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

