जिल्हा परिषद शाळा हळवळ नं.२ चा आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा

जिल्हा परिषद शाळा हळवळ नं.२ चा आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद शाळा हळवळ नं.२ चा आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

जि. प. प्राथमिक शाळा हळवळ नं.२ च्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आज (दि. १७ एप्रिल) रोजी आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार तसेच नव्या वर्गखोलीच्या उद्घाटनाने हा सोहळा रंगणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या स्वागताने होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता नव्याने उभारण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन व रांगोळी प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता रंगमंच शुभारंभ व मान्यवरांचा सत्कार होईल. रात्री ८ वाजल्यापासून शाळेतील विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!