*कोंकण एक्सप्रेस*
*दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये एआय प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
डॉ.आंबेडकर जयतींचे औचित्य साधून दाभोली इंग्लिश स्कूलमध्य शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत एआय प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.
निकॉम कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत निकम यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करीत सद्यस्थितीत दैनंदिन व्यवहारामध्ये होत असलेला एआयचा वापर व भविष्यात या शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात होणारा सकारात्मक उपयोगाची माहिती दिली.

