*कोंकण एक्सप्रेस*
*निरामय विकास संस्थेतर्फे शैक्षणिक टॅब भेट*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
दाभोली इंग्लिश स्कूलची उपक्रमशील शाळा म्हणून ओळख आहे. याची दखल घेऊन सावंतवाडी येथील निरामय विकास संस्थेतर्फे दाभोली इंग्लिश स्कूलला चार शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले.
यावेळी निरामय संस्थेच्या अध्यक्ष डॉ.अनघा सबनीस, उपाध्यक्ष सुधाताई सबनीस, सचिव वंदना करंबळेकर, आसावरी बर्वे, अस्मिता सबनीस, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम खानोलकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, रेश्मा चोडणकर, वसंत पवार आदी उपस्थित होते. निरामय संस्थेच्या पदाधिका-यांनी स्कूलच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि जूनपर्यंत आणखी तीन टॅब देण्याचे जाहीर केले. या दातृत्वाबद्दल स्कूलतर्फे निरामय संस्थेचे आभार मानण्यात आले.

