*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेचा निकाल जाहीर; ५० विद्यार्थ्यांना विमान प्रवास, तर २५० जणांना रोख पारितोषिके*
*कणकवली ः संजना हळदिवे*
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ (STS) परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. प्रमोद कामत आणि बांधकाम सभापती मा. श्री. संतोष साटविलकर यांच्या हस्ते ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या परीक्षेच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांच्या गुणांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, निवडक विद्यार्थ्यांना थेट विमानाने ‘इस्रो’ (ISRO) सफरीची संधी मिळणार आहे.
विमान प्रवास आणि सहलीचे आकर्षण
या स्पर्धेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांतून मिळून एकूण ३० विद्यार्थ्यांना विमानाने इस्रोची सफर घडविण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील पहिल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, इयत्ता २ री व ३ री मधील पहिल्या ५ विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी नेण्यात येणार आहे.
बक्षिसांचा वर्षाव
केवळ सहलच नव्हे, तर जिल्हा गुणवत्ता यादीतील प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५० विद्यार्थ्यांप्रमाणे एकूण २५० विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रमुख गुणवंत विद्यार्थी (इयत्तानिहाय प्रथम ५):
इयत्ता ७ वी (इस्रो सफर):
१. राऊळ वेदा प्रवीण (सावंतवाडी) – १७८ गुण
२. राणे पूर्वा गजानन (हिंदळे) – १७४ गुण
३. पिकुळकर रुद्र रामचंद्र (सांगेली) – १७२ गुण
४. बर्डे प्रारब्ध पृथ्वीराज (कुडाळ) – १७२ गुण
५. बावकर अवनी रामनाथ (सावंतवाडी) – १७० गुण
इयत्ता ६ वी (इस्रो सफर):
१. भिसे अर्णव राजाराम (फोंडाघाट) – १८२ गुण
२. प्रभू दूर्वा रवींद्र (कुडाळ) – १७८ गुण
३. घाडी वीरा राजीव (सावंतवाडी) – १७८ गुण
४. सान्वी विष्णू कुबल (आचरा) – १७६ गुण
५. झेंडे स्वरदा अरविंद (वजराट) – १७४ गुण
इयत्ता ४ थी (इस्रो सफर):
१. वरुटे शर्विल आनंदा (नेरुर) – १९६ गुण
२. पाटील ज्ञानदा नितीन (तळेरे) – १८८ गुण
३. खरात आराध्य बापू (शिरगाव) – १८८ गुण
४. गावकर श्रेयन दयानंद (दिगवळे) – १८६ गुण
५. घोरपडे अखिलेश विजय (कणकवली) – १८४ गुण
इयत्ता ३ री (गोवा सायन्स सेंटर):
१. वालावलकर दक्ष तुषार (सावंतवाडी), २. राणे मोहित पांडुरंग (हडी), ३. पाटील अन्वित संतोष (तळेरे), ४. नाईक धोंडीराज रामचंद्र (केरवडे), ५. बारगडे गौरी खंडू (माडखोल).
इयत्ता २ री (गोवा सायन्स सेंटर):
१. लोट विराज लक्ष्मण (भडगाव), २. रामशे सर्वेश सुनील (कुर्ली), ३. भोसले सर्वज्ञ राजेंद्र (पुरळ), ४. बांदल स्वरांजली योगेश (हिंदळे), ५. सरवणकर ईशा समीर (कोकिसरे).
”सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. त्यांना जागतिक दर्जाच्या संस्था पाहता याव्यात आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
— सौ. संजना संदेश सावंत, अध्यक्षा, युवा संदेश प्रतिष्ठान
गुणवत्ता यादीतील ६ ते ५० क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची सविस्तर यादी केंद्रावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सुशांत मर्गज (9420206326) किंवा प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

