फोंडाघाटचा अर्णव भिसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम; ‘इसरो’ सफरीसाठी झाली निवड

फोंडाघाटचा अर्णव भिसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम; ‘इसरो’ सफरीसाठी झाली निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाटचा अर्णव भिसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम; ‘इसरो’ सफरीसाठी झाली निवड!*

*फोंडाघाट : संजना हळदिवे*

विशेष प्रतिनिधी न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जानेवारी २०२६ मध्ये युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षा’ (STS) मध्ये प्रशालेचा विद्यार्थी कु. अर्णव राजाराम भिसे याने उत्तुंग यश संपादन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे अर्णवची मानाच्या ‘इसरो’ (ISRO) सफरीसाठी निवड करण्यात आली आहे.
यशाची परंपरा: ६ वी आणि ७ वीचे विद्यार्थी चमकले
केवळ अर्णवच नव्हे, तर प्रशालेच्या इतर ५ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत सुयश मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा तपशील खालीलप्रमाणे:
इयत्ता ६ वी:
• कु. अर्णव राजाराम भिसे: गोल्ड मेडल (जिल्ह्यात प्रथम)
• कु. श्रेया साहिल डोर्ले: सिल्व्हर मेडल
• कु. निया सुहास एकावडे: ब्रांझ मेडल
इयत्ता ७ वी:
• कु. पूर्वा मारुती लाड: सिल्व्हर मेडल (जिल्ह्यात ४१ वा क्रमांक)
• कु. लिशा पंढरीनाथ गुरव: ब्राँझ मेडल
• कु. रुद्राक्ष विजयकुमार राठोड: ब्रांझ मेडल
मार्गदर्शकांचे योगदान
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे विभाग प्रमुख श्री. गोसावी सर यांचे विशेष परिश्रम लाभले आहेत. तसेच श्री. राठोड सर, सौ. पवार मॅडम, श्री. नानचे सर आणि श्री. कदम सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. के. पारकर, पर्यवेक्षक श्री. व्ही. पी. राठोड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ‘हार्दिक अभिनंदन’ करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!