जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

यामध्ये शंकर बर्गे, अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जात पडताळणी समिती, रत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते वैभववाडी, कणकवली, देवगड व मालवण या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यांचा संपर्क क्रमांक 9579735559 असा आहे.

तसेच इब्राहिम चौधरी, अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई यांची नियुक्ती कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9881794221 असा आहे.

नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!