नवीन कुर्ली गावातील महिलांची धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देणारी यात्रा सहल

नवीन कुर्ली गावातील महिलांची धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देणारी यात्रा सहल

*कोंकण एक्सप्रेस*

*नवीन कुर्ली गावातील महिलांची धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देणारी यात्रा सहल*

*’नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ’ व ‘नवदुर्गा युवा मंडळा’कडुन आयोजन-*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

नवीन कुर्ली फोंडाघाट गावात नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणा-या ‘नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ’ (रजि.) व ‘नवदुर्गा युवा मंडळ’ (रजि.) यांच्या संयुक्त आयोजनाने व माजी सभापती मनोज रावराणे यांच्या विशेष सहकार्यातुन गावातील महिलांची व लहान मुलांची धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देणारी यात्रा सहल दि. ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली.
सकाळी ०७:०० वा.च्या सुमारास माजी सभापती मनोज रावराणे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ व नवदुर्गा युवा मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवुन रा.प. महामंडळाच्या २ बसेस जिल्ह्यातील धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देण्यासाठी नवीन कुर्ली गावातुन मार्गस्थ झाल्या. प्रथमत: शिवाजी महाराजांच्या अनेक आठवणी असणा-या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्लास भेट दिली. या किल्ल्यास भेट दिल्याने सहलीतील विद्यार्थांना शैक्षणिकदृष्या महाराजांनी गनिमी कावे करुन जिंकलेले अनेक गड- किल्ले, अनेक आठवणी, विविध पैलु जाणुन घेता आल्या. त्यानंतर वाडा येथील ऐतिहासिक प्राचीन विमलेश्वर मंदिर, प्रेक्षणिय व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे देवगड येथील पवनचक्की गार्डन, दक्षिण कोकणची काशी समजले जाणारे कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर चौपटी आदी स्थळांना भेटी दिल्या.
दुपारच्या सत्रात गजबादेवी मंदिर तांबळडेग, रामेश्वर मंदिर मिठबाव, श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर पोखरबाव व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड आदी धार्मिक व प्रेक्षणिय स्थळांना भेट देवुन रात्री उशीरा दोन्ही बस नवीन कुर्ली गावात सुखरुप दाखल झाल्या. गावातील बहुतांशी महिला व लहान मुलांनी या यात्रा सहलीमध्ये सहभाग घेतला, या यात्रा सहलीमध्ये प्रेक्षणिय स्थळांसोबत ऐतिहासिक प्राचीन मंदिरे पहावयास मिळाल्याने लहान मुले व महिलांमध्ये कमालीचा उत्साह दिसुन येत होता.


यात्रा सहल यशस्वी करण्याकरीता कणकवली माजी सभापती श्री. मनोज रावराणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, सचिव धीरज हुंबे, कृष्णा परब, सदाशिव राणे, सखाराम हुंबे, शिवाजी चव्हाण नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, प्रशांत दळवी, अमित दळवी, प्रकाश हुंबे आदीचे सहकार्य तसेच रा.प. महामंडळ सिंधुदुर्ग विभाग, कणकवली आगार यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!