सामान्य व्यक्ती म्हणून २४ तास जनता सेवेसाठी – नीता सावंत-कविटकर..

सामान्य व्यक्ती म्हणून २४ तास जनता सेवेसाठी – नीता सावंत-कविटकर..

*कोंकण एक्सप्रेस*

*सामान्य व्यक्ती म्हणून २४ तास जनता सेवेसाठी – नीता सावंत-कविटकर..*

*सावंतवाडी :शुभम गवस*

“मी सामान्य व्यक्ती आहे आणि निवडून आल्यानंतरही माझी दारे सर्वसामान्यांसाठी २४ तास उघडी राहतील,” असे आश्वासन शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता सावंत-कविटकर यांनी प्रचार सभेत दिले.
नगराध्यक्ष झाल्यावरही “परवानगीशिवाय आत येऊ नये” असा फलक आपल्या घरी दिसणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांप्रती सहज उपलब्धता अधोरेखित केली.
शहरातील तलावाचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांची समस्या आणि विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही सावंत यांनी यावेळी दिली.
शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन शहर विकासासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!