सुडाच राजकारण आणि सावंतवाडीची असुरक्षित दयनंदीन सुख सुविधा याचा विचार विनिमय योग्य वेळेस होणं गरजेच आहे -अमित वेंगुर्लेकर

सुडाच राजकारण आणि सावंतवाडीची असुरक्षित दयनंदीन सुख सुविधा याचा विचार विनिमय योग्य वेळेस होणं गरजेच आहे -अमित वेंगुर्लेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*सुडाच राजकारण आणि सावंतवाडीची असुरक्षित दयनंदीन सुख सुविधा याचा विचार विनिमय योग्य वेळेस होणं गरजेच आहे -अमित वेंगुर्लेकर*

*सावंतवाडी  : प्रतिनिधि*

आज फक्त राजकारण आणि तू तू मै, मैं या चढाओढीतच आम्हा सावंतवाडी मधील जनतेला संभ्रमात ठेवलं जात आहे की नक्की कोणासाठी विचार विनिमय करावा म्हणजे आमच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील?
आजच्या परिस्थितीत ना वीज पुरवठा सुरळीत आहे,ना रेशन दुकान वेळेत सुविधा देत आहेत, ना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देण्याची जबाबदारी हे राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी पूर्ण करत आहेत. आज स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागत आहे शासकीय रुग्णालयात सुविधांचा तुटवडा भासत आहे?
रुग्ण दखल केला की काही मिनिटातच तेथील आरोग्य अधिकारी बांबुली येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठीचे पत्र देतोय!
मगं रूग्ण सेवा वाहनाची तरतूद करताना परत नाके नऊ येतात त्यात रहदारीचा रस्ता असुरक्षित आहे मगं यासाठी कोण भांडणार ? हे प्रश्न जनतेचे नाहीत का?
सर्वसामान्य नागरिकांना साधा वीज मीटर घेताना हे संबंधित अधिकारी दिशाभूल करतात शेवटी पाच हजार रुपये मोजावे लागतात आणि मग बाकीचा हिशोब होतो!
आपल्याच जगातील धोकादायक झाडं तोडण्यासाठी आरोपी सारखे हेलपाटे मारावे लागतात फॉरेस्ट खात्याकडे, मतदानाच्या वेळीस सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी साधा आपल्या वॉर्ड मधील रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मदत करतील तर” शप्पथ” फक्त आपल्या सभोवताली फिरणारी रुबाबदार मंडळी सोडून इतर सर्वसामान्य लोकांना मात्र आपल्या दैनंदिन गरजांच्या सुख सुविधांसाठी मात्र सतराशे साठ हेलपाटे त्या त्या शासकीय कार्यालयात जाऊन पैसे मोजूनच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात मगं चुकी कोणाची?
तस बघितलं तर आमचीच करण ना स्पष्ट बोलू शकतो ना त्या सामाजिक कार्यकर्त्यांना जाब विचारू शकतो आणि हे असेच कित्येक वर्षे सुरूच आहे
ना सावंतवाडी बस स्थानकाच्या बाबतीत सुधारणा झाली,ना उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी उपचारासाठी डॉक्टरांची नेमणूक झाली, ना विद्युत पुरवठा सुरळीत झाला, ना पाणी पुरवठा वेळेत पूर्ण होतोय, ना दरातील रहदारीच्या बाबतीत संबंधित शासकीय कधिकारी दाखल घेत आहेत?
फक्त मोती तलावाभोवती खर्च? हेल्थ क्लब मध्ये वर्षाचे बाराही महिने काम सुरूच! गटबुक नकशा मधील मुख्य रस्ते मात्र शहरातील नवनवीन इमारतींच्या बांधकाम प्रक्रियेमुळे कमी होत चालले आहेत! आमचे सावंतवाडी शहरातील प्राचीन मंदिर, मुख्य बाजारपेठे येथील चंदुभुवन येथील गटार, पार्किंग सुविधा मात्र गेली कित्येक वर्षे प्रतीक्षेतच आहेत;;;;
शहरातील व्यावसायिकांच्या बाबतीत कोणीही सामाजिक कार्यकर्ते दखल घेत नाहीत काहीही परजिल्ह्यातील व्यक्ती इथे येऊन विविध प्रकारचे व्यवसाय येथीलच स्थानिक लोकांची जागा हॉल भाड्याने घेऊन करतात आणि येथील व्यवसायांना मात्र मूग गिळून गप्प बसाव लागत कारण काय?
तर मत भेद तू कोणाचा माणूस इथून मदत द्यायला सुरुवात होते हे कुठेतरी थांबल पाहिजे नाही तर आता भांडताय? की हा राज्य मार्ग इथून जातोय? तो हे म्हणाला! मग मी हा मार्ग सावंतवाडी शहरातून होण्यासाठी प्रयत्न करणार ? हे आता शक्य आहे का?
मग निदान अजूनही वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी निदान सावंतवाडीतील जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून एकत्र येऊन निर्णय घेऊया आज रेल्वेथांबा ही काळाची गरज आहे असे बरेच गैरसोयीचे मुद्दे आहेत ज्याचे निवारण सर्वसामान्य सावंतवाडी येथील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वेळेस होणे गरजेचे आहे त्यामुळे कृपया आपले सुडाचे राजकारण तुर्तास बाजूला ठेऊन आम्हा सावंतवाडी तालुक्यातील त्रेसष्ठ गावांच्या विकासात्मक योजनाचा विचार करून मूलभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाटपुरावे करावेत असे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!