*कोंकण एक्सप्रेस*
*खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण*
*सिंधुदुर्गनगरी*
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या व्यापक वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ही वृक्षारोपण मोहीम जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली.

