*कोंकण एक्सप्रेस*
*काँग्रेसचे आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते वैकुंठ गोविंद परब( वय 73) यांचे निधन*
* सिधुदुर्गनगरी*
काँग्रेसचे आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते मुंबई माझगाव संतमित्र गोविंदराव परब चौकातील मराठा क्लाँथ स्टोअरचे मालक वैकुंठ गोविंद परब( वय 73) यांचे मुंबई भायखळा येथे नुकतेच निधन झाले ते मूळ कुडाळ तालुक्यातील बांबुळी गावचे रहिवासी आहेत. बांबुळी भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते परोपकारी वृत्ती हा त्यांचा स्वभाव होता सिंधुदुर्ग जिल्हा युथ फेडरेशनचे संस्थापक( कै. )वाय्.डी. सावंत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समवेत त्यांनी सहकारी म्हणून काम केले आहे सद्गुरु वामनराव पै महाराज,( कै)व्ही.के.तोरसकर छगन भुजबळ, मनसेचे बाळा नांदगावकर, बॅ.नाथ पै, वामनराव महाडिक, मधु दंडवते यांच्याशी निकटवर्तीय संबंध होते त्याच्या पश्चात पत्नी, विवाहित पुत्रराज राजशेखर रवीराज, राखी रूही, बंधू अशोक, शरद व भगिनी किशोरी शकुंतला नातवंडे असा मोठा परिवार आहे कला क्षेत्राशीही ते निगडित होते. कवी रघुबंधू यांच्या मालवणी धुमशान या नाटकाचे ती सूत्रधार होते भगवानदादा पालव हे त्यांना मित्र मानीत कवीरामचंद्र परब यांच्या समवेत त्यांनी गेलीअनेक वर्ष बांबुळी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे कामकाज यशस्वीपणे पाहिले संतमित्र व्यापारी मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते मित्र परिवाराही मोठा आहे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मुंबई सह कुडाळ तालुक्यात हळहळव्यक्त करण्यात येत आहे.

