*कोंकण एक्सप्रेस*
*मतदारसंघातील शिवसैनिकांचे योगदान हे निश्चितच पक्षवाढीला नवसंजीवनी देणारे – आम.निलेश राणे*
*कुडाळ : प्रतिनिधी*
शिवसेनेच्या विचारधारेचा अधिकाधिक विस्तार व्हावा आणि शिवसैनिकांची नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी,यासाठी भव्य शिवकार्य – सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास स्थानिक शिवसैनिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवसेनेच्या तळागाळातील कामांमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक अधिक बळकट होत आहे.कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे हे योगदान निश्चितच पक्षवाढीला नवसंजीवनी देणारे आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ-मालवण विधानसभेचे क्षेत्र प्रमुख सन्माननीय बबनजी शिंदे, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख श्री. आनंद शिरवलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष श्री. संजू परब, तालुका प्रमुख श्री.बंटी तुळसकर,अरविंद करलकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, महीला जिल्हा समन्वयक अंजना सामंत, महिला उप. जिल्हा प्रमुख श्रीमती नीलम शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सौ. सिद्धी शिरसाट, दादा साईल उपस्थित होते.

