*’ त्या ‘ युवतीच्या पाकिस्तानी स्टेटसचा शिवसेना अल्पसंख्याक सेलकडून निषेध…

*’ त्या ‘ युवतीच्या पाकिस्तानी स्टेटसचा शिवसेना अल्पसंख्याक सेलकडून निषेध…

*कोकण Express*

*’ त्या ‘ युवतीच्या पाकिस्तानी स्टेटसचा शिवसेना अल्पसंख्याक सेलकडून निषेध…!*

*कणकवली पोलीस निरीक्षकांकडे उ.बा.ठा.शिवसेनेच्या वतीने कारवाईची मागणी…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरा लगतच्या गावातील एका युवतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करणे व हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन मीडिया मध्ये प्रसिद्ध केला. या घटनेचा उ.बा.ठा. गट शिवसेना अल्पसंख्याक समाजाकडून निषेध केला. या घटनेची सखोल चौकशी करत कारवाई करण्याची मागणी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जिद अब्बास बटवाले यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी उ.बा.ठा.गटाचे शिवसेना आम.वैभव नाईक, शिवसेाना नेते सतीश सावंत, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया परकर, राजु राठोड, सचीन आचरेकर,अनुप वारंग, निसार शेख,विलास गुडेकर,नितेश भोगले आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, या पोस्टमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर युवतीवर योग्यती चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्यात यावी. सदरचा झालेला प्रकार हा समाज विघातक कृत्य आहे. त्याचा आम्ही सिंधुदुर्ग शिवसेना अल्पसंख्यांक समजाकडून जाहीर निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे. या घटनेचा तपास सुरू असून चौकशी अंती या युतीवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!