व्यापारी एकता मेळाव्यास पाठींबा परंतु दुकान बंद ठेऊन सहभागी व्हा या व्यापारी संघाच्या आवाहनाला विरोध

व्यापारी एकता मेळाव्यास पाठींबा परंतु दुकान बंद ठेऊन सहभागी व्हा या व्यापारी संघाच्या आवाहनाला विरोध

*कोकण Express*

*व्यापारी एकता मेळाव्यास पाठींबा परंतु दुकान बंद ठेऊन सहभागी व्हा या व्यापारी संघाच्या आवाहनाला विरोध*

*विष्णू मोंडकर,जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ

*सिंधुदुर्ग*

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित दिनांक ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे.व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी हि संघटना चांगले कार्य करत आहे पर्यटन महासंघ स्थानिक व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या सोबत आहे .परंतु व्यापारी महासंघाच्या व्यवसाय बंद ठेऊन सहभाग या आवाहनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाचा विरोध आहे दोन वर्षात कोरोना महामारीमुळे उध्वस्त झालेल्या व्यावसायिकाला व्यवसाय बंद ठेवणे हे आवाहन चुकीचे वाटते तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पध्धतीने असल्याने आपण व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकता.*
*पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेऊन ऑनलाईन व्यापारी मेळाव्यात आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!