नीलम राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

नीलम राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

*कोकण Express*

*नीलम राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क*

*कणकवलीत भाजपा बुथवर थांबून कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जिल्हा बँकेसाठी होत असलेल्या अटीतटीच्या लढतीच्या मतदानाच्या निर्णायक क्षणी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी कणकवली मतदान केंद्रावर आपले मतदान केले. त्यानंतर नीलम राणे यांनी भाजपच्या बुथवर भेट दिली. अत्यंत चुरशीने निवडणूक होत असलेल्या कणकवली तालुका शेती संस्था मतदारसंघात सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई अशी लढत आहे. या लढतीकडे केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.या पार्श्वभूमीवर कणकवलीत भाजपाच्या बुथवर आलेल्या नीलम राणे यांनी बुथवर थांबून कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!